लघनौ- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. त्याठिकाणचे प्रशासन कामगारांची राहण्या-खाण्याची सोय करीत आहे. मात्र, तरीही कामगारांचा धीर सुटत असल्याने कामगार घरी जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता छुप्या पद्धतीने मालवाहतून गाड्यातून प्रवास करीत आहेत. अशाच प्रकारचा प्रवास करणाऱ्या कामगारांना उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यीतील हर्रैया चेकपोस्ट वर पोलिसांनी पकडले आहे.
ट्रकमधून प्रवास करणारे 36 कामगार पकडले... जात होते महाराष्ट्रातून युपीला - लाॅकडाऊन बातमी
महाराष्ट्रात कामानिमीत्त उत्तर प्रदेशातील अनेक कामगार येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लाॅकडाऊन लागू करण्यात आल्याने हे कामगार राज्यातच अडकून पडले. त्यामुळे प्रशासनाच्या नजरेआडून ते गावाकडे जाण्याच्या प्रयत्न करीत आहेत. असेच 36 कामगार उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ट्रकमध्ये लपून प्रवास करीत होते.
हेही वाचा-विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग
महाराष्ट्रात कामानिमीत्त उत्तर प्रदेशातील अनेक कामगार येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लाॅकडाऊन लागू करण्यात आल्याने हे कामगार राज्यातच अडकून पडले. त्यामुळे प्रशासनाच्या नजरेआडून ते गावाकडे जाण्याच्या प्रयत्न करीत आहेत. असेच 36 कामगार उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात ट्रकमध्ये लपून प्रवास करीत होते. मात्र, या ट्रकची बस्ती जिल्ह्यातील हर्रैया चेकपोस्टवर तपासणी झाली तेव्हा पोलिसांना हे कामगार आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना पकडून क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्या गावाकडे पाठवले आहे.