भोपाल (म.प्र)-भोपाळ गॅस दुर्घनेला आज ३५ वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र, पीडितांना अद्याप न्याय मिळाला नसल्याचे दृष्य आहे. या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. व बऱ्याच नागरिकांची प्रकृती ढासळली होती. त्यानंतर राज्य शासन व केंद्र शासनाकडून मदतीचे वेळोवेळी आश्वासन देण्यात आले. मात्र, ही आश्वासने आजतागायत पूर्ण न झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत, मोबदला, योग्य उपचार मिळेल या आशेने पीडित आजही शासनाकडे आस लावून बसले आहेत.
२ व ३ दिसंबर १९८४ दरम्यान भोपाळ येथील यूनियन कार्बाइड फक्ट्रीमधून ३० टन विषारी वायू (मिथाईल आईसोसाइनेट) बाहेर निघाली होती. या विषारी वायूमुळे भोपाल शहरातील १५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आजपर्यत भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांनी शासनाकडून मोबदला मिळविण्यासाठी अनेक निदर्शने, मोर्चे केलीत. मतदान बहिष्कारही केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. नेत्यांनी पीडितांना मदतीची आश्वासने दिलीत. त्यानुसार शासनाकडून मोबदलाही मिळाला. मात्र, तो तुटपुंजा निघाला.