जम्मू-काश्मीर : ३ दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची कारवाई
सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली.
शोपिया जिल्ह्यातील केलर परिसरात ही चकमक झाली.
श्रीनगर -सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील केलर परिसरात ही चकमक झाली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली.