स्टॉकहोम - भौतिकशास्त्रातील २०२० चे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले आहे. रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेया गेझ अशी पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे आहेत.
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना जाहीर
भौतिकशास्त्रातील २०२० चे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले आहे. रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेया गेझ अशी पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे आहेत.
रॉजर पेनरोझ यांना 'ब्लॅक होल डिस्कवरी'साठी आणि रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेया गेझ यांना आकाशगंगेच्या मध्यभागी 'सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्ट' शोधल्याबद्दल पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळणाऱ्या शास्त्रज्ञांना सुवर्ण पदकासोबत ११ लाख डॉलरहून अधिक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. स्वीडिश इन्वेन्टर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सचिव होरन हॅन्सन यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
गेल्या वर्षी बिग बॅंगनंतरच्या कार्याबद्दल कॅनेडियनमध्ये जन्मलेल्या कॉस्मॉलॉजिस्ट जेम्स पीबल्स यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यंदा कोरोना महामारीमुळे कार्यक्रमाला जास्त लोक उपस्थित राहू शकलेले नाहीत.