उत्तर प्रदेश - उन्नाव बलात्कार पीडितेच्या सुरक्षेसाठी नेमलेले ३ पोलीस निलंबित करण्यात आले आहेत. पीडितेच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन महिला पोलिसांचा समावेश आहे. हा खटला निपक्षपातीपणे चालण्यासाठी सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.
उन्नाव बलात्कार: पीडितेच्या सुरक्षेसाठी नेमलेले ३ पोलीस कर्मचारी निलंबित - निलंबीत
सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना अपघात प्रकरणाच्या चौकशीला किती दिवस लागतील याबाबत विचारणा केली.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) दुपारपर्यंत तपासातील प्रगतीबाबत अहवाल मागितला आहे. तसेच या प्रकरणी सुनावणीही लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना पीडितेच्या अपघात प्रकरणी चौकशीला किती दिवस लागतील याबाबत विचारणा केली. मेहता यांनी एक महिन्याचा वेळ मागितला असता सरन्यायाधीशांनी ७ दिवसांत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर न्यायाधीशांनी पीडितेच्या प्रकृतीचीही चौकशी केली.