उदयपूर - जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. शहरामध्ये गुरुवारी एक रुग्ण सापडला होता. आज शुक्रवारी तीन नवे रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन हादरले आहे. उदयपूरमध्ये कोरोना संक्रमित झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. त्यांना प्रशासनाने आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.
राजस्थानातील कोरोना संक्रमित झालेल्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. गुरूवारी एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर शुक्रवारी तिघांच्या कोरोना व्हायरस चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यातील एक रुग्ण अलिकडेच इंदूरहून आला होता. त्यानंतर त्याला प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले होते.