श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारत काश्मिरात तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यातील रंगवार भागामध्ये पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार केला.
काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू - रंगवार भागामध्ये पाकिस्तानचा गोळीबार
कुपवाडा जिल्ह्यातील रंगवार भागामध्ये पाकिस्तानने अंदाधुंद गोळीबार केला.
संग्रहित छायाचित्र
शुक्रवारी (दि 10) भारतीय लष्कराने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिले होते. दहशतवादी तळ, मोठ्या प्रमाणवर असलेला शस्त्रसाठा हा उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.