नवी दिल्ली - भारतामध्ये १४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, भारताबाहेर ज्या देशांमध्ये कोरोना जास्त प्रसार झाला आहे, तेथे तब्बल २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा भारतात संसर्ग झालेल्यांपेक्षा जास्त आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेमध्ये आज माहिती दिली.
परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची लागण; इराणमध्ये सर्वाधिक २५५ रुग्ण
सर्वात जास्त २५५ भारतीय रुग्ण इराणमध्ये आहेत. तर संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर
सर्वात जास्त २५५ रुग्ण इराणमध्ये आहेत. तर संयुक्त अरब अमिरातमध्ये(युएई) १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीत ५ तर हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकेत प्रत्येकी १ रुग्ण आहे. या सर्वांवर तेथे उपचार सुरू आहेत.
जगभरामध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ८० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक आरोग्य आणिबाणी घोषित केले आहे.