नवी दिल्ली / गाझियाबाद :उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. या घटनेतील पीडिता ही वाल्मिकी या दलित समुदायातील होती. या समाजातल्या ५० कुटुंबातील २३६ नागरिकांनी हाथरस घटनेनंतर दुखी होऊन बौद्ध धर्म स्वीकारला आहे. गाझियाबादमधील करहेडा परिसरात ही धर्मांतराची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ तारखेला करहेडा परिसरात राहणाऱ्या २३६ नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. हाथरस घटनेनंतर आमच्यात भीती पसरल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले. वाल्मिकी समाज हा आर्थिकदृष्ट्या उपेक्षित असून आमच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाकारले जात असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे. १४ ऑक्टोबरचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये राजरत्न आंबेडर सर्वांना बौद्ध धर्माची दिक्षा देताना दिसत आहेत.
समाजातील इतर कुटुंबीयांशी चर्चा सुरू