नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला 2020 साठी नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांच्यासह 21 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. गदीश जल अहुजा, मोहम्मद शरिफ, तुलसी गौडा आणि मुन्ना मास्टर यांचाही या 21 जणांमध्ये समावेश आहे.
पद्मश्री पुरस्कारांची घोषणा; पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांचा समावेश - padma shri award News
महाराष्ट्रातील पोपटराव पवार आणि राहीबाई सोमा यांच्यासह 21 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे
पोपटराव पवार हे 'आदर्शगाव हिवरे बाजार' चे सरपंच असून जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. तर 'सीड मदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना शेती क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. जगदीश जल अहुजा हे 'लंगर बाबा' म्हणून ओळखले जातात. ते गेली कित्येक वर्षांपासून दररोज 500 पेक्षा जास्त गरीब रुग्ण आणि गरजूंना जेवण पुरवण्याचे काम करतात.
Last Updated : Jan 25, 2020, 11:20 PM IST