नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 2 हजार 81 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यातील 431 जण उपचारानंतर बरे झाले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे. एकून संसर्ग झालेल्यांपैकी 1 हजार 603 अॅक्टिव्ह केसेसे आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पुढे; 47 दगावले - दिल्ली कोरोना
कोरोनामुळे जोपर्यंत नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तोपर्यंत सरकार सर्व दिल्लीकरांना अन्नधान्य पुरवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
कोरोनामुळे जोपर्यंत नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तोपर्यंत सरकार सर्व दिल्लीकरांना अन्नधान्य पुरवणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांनी 18 हजारांचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत 18 हजार 601 रुग्ण आढळून आले असून 3 हजार 252 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. काल (सोमवार) दिवसभरात 705 जण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 17.48 टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.