रांची -झारखंडमधील टाटीसिलवे पोलीस स्थानक परिसरातील बंद घरातून चोरांनी 20 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या मार्च महिन्यापासून घरमालक शहराबाहेर अडकलेला होता. त्यामुळे घर काही महिन्यांपासून बंद होते.
झारखंड : चोरांनी बंद घरातून 20 लाख रुपयांचा ऐवज लुटला - झारखंड
झारखंडमधील टाटीसिलवे पोलीस स्थानक परिसरातील बंद घरातून चोरांनी 20 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.
टाटीसिलवे
लॉकडाऊन शिथिल झाल्याने घरमालक घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे उघड झाले आहे. घर बंद असल्याने संधी साधून चोरांनी सुमारे 20 लाखांचे दागिने चोरले आहेत. याबाबत घरमालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.