महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 16 ठार, 29 जखमी - Medical Officer, Emergency Ward of Saifai Mini PGI

उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघात 16 जण जागीच ठार झाले आहेत.

फिरोजाबाद उत्तर प्रदेश
आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात

By

Published : Feb 13, 2020, 3:55 AM IST

Updated : Feb 13, 2020, 8:21 AM IST

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) - फिरोजाबाद येथील भदान येथे बुधवारी रात्री आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 16 जण ठार झाले, तर बसमध्ये असणारे इतर 29 प्रवासी जखमी झाले आहेत.

आग्रा-लखनऊ द्रुतगती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात

हेही वाचा...केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा

या अपघाताबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये किमान 40 ते 45 प्रवासी होते. जखमींना सैफई येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा...खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा

सैफई येथील रुग्णालातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 16 जण ठार, तर 29 प्रवासी जखमी झाले आहेत.

Last Updated : Feb 13, 2020, 8:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details