महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये दिवसभरात 153 रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 888

भारतामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 20 हजार 471 झाली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 22, 2020, 11:15 PM IST

जयपूर- राजस्थानात आज (बुधवार) दिवसभरात 153 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. जयपूर शहरात सर्वात जास्त 68 तर अजमेरमध्ये 44 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 888 झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने यासंबधीची माहिती दिली आहे.

तर राजधानी दिल्लीत आज दिवसभरात 92 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 248 झाली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कंटेनमेंट झोनची संख्या 89 झाली आहे.

भारतामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 20 हजार 471 झाली आहे. त्यातील 3 हजार 690 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 652 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details