लखनऊ - उत्तर प्रदेशात १४ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील ३ दिवसांत राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. अधिकृत माहितीनुसार, ९ जुलै ते १२ जुलैदरम्यान १५ लोक, २३ प्राणी मरण पावले. तर, तब्बल १३३ इमारतील या ४ दिवसांत कोसळल्या.
उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हर्दोई, खिरी, गोरखपूर, कानपूरनगर, पिलिभीत, सोनभद्र, चंडोली, फिरोजाबाद, माऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.