महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू - देशात कोरोनामुळे मृत्यू न्यूज

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली आहे.

Coronavirus India update : 14,933 COVID-19 cases, 312 deaths reported in 24 hours
देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू

By

Published : Jun 23, 2020, 10:27 AM IST

Updated : Jun 23, 2020, 11:31 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत ३१२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ११ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे झाले. देशभरात १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. या यादीत ब्राझील आणि रशियानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. याशिवा अॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा विचार केल्यास भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत ६ हजार २८३ मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर गेली आहे. यातील ६७ हजार ७०६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. नवी दिल्लीमध्ये ६२ हजार ६५५ कोरोनाबाधित आहेत. तर २ हजार २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६ हजार ६०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा -J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण

हेही वाचा -अक्साई चीनवरचा हक्क सोडा आणि तडजोड करा; सुधींद्र कुलकर्णींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

Last Updated : Jun 23, 2020, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details