नवी दिल्ली - गुजरातमधील जामनगर येथे कोरोनामुळे 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे बाळाची चाचणी करण्यात आल्यानंतर 5 एप्रिलला चाचणी पाझिटिव्ह आली होती. विषाणूमुळे शरीरातील अवयव निकामी झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय आधिकाऱयांनी सांगितले.
गुजरात : कोरोनामुळे 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू... - कोरोनामुळे 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
गुजरातमधील जामनगर येथे कोरोनामुळे 14 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
मुलांच्या आई-वडिलांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. बाळाचे पालक हे उत्तर प्रदेश येथील असून जामनगर येथील कारखान्यांमध्ये मजुरीचे काम करतात. ते राहत असेलेला संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात आला असून बाळाला कोरोनाची बाधा कोठून झाली, याचा तपास अधिकारी करत आहेत.
जेव्हा बाळाला रुग्णालयात दाखल केले तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कोरोना चाचणी पाझिटिव्ह आल्यानंतर त्याला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे वैद्यकीय आधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 16 वर गेली आहे. तर 175 जण कोरोनाबाधित आहेत.