महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गेल्या तीन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात सहा हजारांवर एन्काऊंटर; १२२ गुन्हेगारांचा मृत्यू - विकास दुबे एन्काऊंटर

कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर उत्तर प्रदेश पोलिसांचा हा पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे. यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी २० मार्च २०१७ ते १० जुलै २०२०पर्यंतच्या चकमकींची माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितले, की तीन वर्षांमध्ये राज्यात एकूण ६, १२६ चकमकी झाल्या.

122 criminals killed in 6,126 encounters in Uttar Pradesh in past 3 years
गेल्या तीन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात सहा हजारांवर एन्काऊंटर; १२२ गुन्हेगारांचा मृत्यू..

By

Published : Jul 15, 2020, 4:29 PM IST

लखनऊ - गेल्या तीन वर्षांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तब्बल सहा हजारांहून अधिक चकमकी झाल्या आहेत. यामध्ये १२२ गुन्हेगारांना ठार मारण्यात आले असून, १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर उत्तर प्रदेश पोलिसांचा हा पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे. यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी २० मार्च २०१७ ते १० जुलै २०२० पर्यंतच्या चकमकींची माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितले, की तीन वर्षांमध्ये राज्यात एकूण ६, १२६ चकमकी झाल्या. यांमध्ये १३, ३६१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तर, २, २९६ गुन्हेगार जखमी झाले. यासोबतच, ९०९ पोलीस कर्मचारीही यांमध्ये जखमी झाले.

३ जुलैला कानपूरमध्ये झालेल्या चकमकीबाबत बोलताना ते म्हणाले, की या प्रकरणातील २१ आरोपींपैकी सहा जणांना ठार मारण्यात आले आहे. चार जणांना अटक करण्यात आले असून, आणखी ११ आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या चकमकीमध्ये आठ पोलिसांचा बळी गेला होता. तर एका नागरिकासह आणखी सात जण जखमी झाले होते. यानंतर १० जुलैला विकास दुबे पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्याचे प्रमाण कमी झाल्याचे कुमार यांनी सांगितले. एक जानेवारी २०२० ते १५ जून २०२०दरम्यान लुटमारीच्या एकूण ५७९ घटनांची नोंद झाली. गेल्यावर्षी याच काळात नोंद झालेल्या घटनांच्या तुलनेत या ४४.१७ टक्क्यांनी कमी आहेत. यासोबतच, या काळात दरोड्याच्या ३३ घटनांची नोंद झाली; ज्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.७४ टक्क्यांनी कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच काळात यावर्षीच चोरीच्या २, ६०४ घटना, हुंडाबळीच्या १, ०१९ घटना आणि बलात्काराच्या ९१३ घटनांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या घटना अनुक्रमे ३०.९७, ६.३४ आणि २५.४१ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत असे कुमार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details