LIVE: हवाई दलाच्या जिगरबाजांनी पाकिस्तानात घूसुन दहशतवाद्यांचा केला खात्मा - pak
पाकिस्तानमधील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे भागात हवाई दलाने ही कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला.
एअर स्ट्राइक
भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसी ओलांडून बॉम्बफेक केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. १२ मिराज विमाने पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले.
Last Updated : Feb 26, 2019, 5:24 PM IST