छत्तीसगड- प्रवासी कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला आहे. ही बस कामगारांना घेऊन मुंबईहून पश्चिम बंगालच्या मैत्रीपूर येथे जात होती. बसचा अपघात एनएच 53 वरील कुहरी आणि छछान दरम्यान झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 26 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे.
छत्तीसगडमध्ये प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, 12 जण जखमी
प्रवासी कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला आहे. ही बस कामगारांना घेऊन मुंबईहून पश्चिम बंगालच्या मैत्रीपूर येथे जात होती. बसचा अपघात एनएच 53 वरील कुहरी आणि छछान दरम्यान झाला.
प्रवासी मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला डुलकी आल्याने हा अपघात घडला. घटनेत जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या बसने त्यांच्या मुळ गावी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने अनेक कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अपघातात राजनांदगावमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता.