नई दिल्ली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे मरकझ मधील सुमारे 2 हजार 300 लोकांना प्रशासनाने त्या ठिकाणाहून हलविले आहे. या कारवाईत सामील झालेल्या निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या 11 पोलिसांनी मुंडण केले आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 7 पोलिसांना क्वारंटाईन केले आहे. असे करणे हे रुटीन प्रक्रिया असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
तबलिगी मरकझ: 11 पोलिसांचे मुंडण, तर 7 जणांना क्वारंटाईन... - तबलिगी मरकझ
नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे मरकझ मधील सुमारे 2 हजार 300 लोकांना प्रशासनाने त्या ठिकाणाहून हलविले आहे. या कारवाईत सामील झालेल्या निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या 11 पोलिसांनी मुंडण केले आहे. त्याचबरोबर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या 7 पोलिसांना क्वारंटाईन केले आहे.
हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन येथील करकझ येथून लोकांना बाहेर काढण्याचे काम गेल्या रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. हे काम सोमवारी व मंगळवारी करण्यात आले. लोकांना बाहेर काढण्यासाठी निजामुद्दीन पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गेले होते. त्या पथकातील पोलिसांना कोरोना होऊ नये, खबरदरी म्हणून त्यांचे मुंडण करण्यात आले आहे. तर पोलीस ठाण्यातील 7 जणांना क्वारंटाईन केले आहे.