महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गाझियाबाद : दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांची बाचाबाची, २ डीटीसी बससेना पाठवले परत - यूपी गेट

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या खोडा पोलिसांनी दिल्लीकडून येणाऱ्या २ डीटीसी बसेसना सीमेवर अडवले. या दोन्ही बसमध्ये जवळपास १०० प्रवासी होते. खोडा पोलिसांना ते उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी पोहचून या दोन्ही बस अडवल्या. मात्र, यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांची बाचाबाची
दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांची बाचाबाची

By

Published : Apr 15, 2020, 8:45 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या खोडा पोलिसांनी दिल्लीकडून येणाऱ्या २ डीटीसी बसेसना सीमेवर अडवले. या दोन्ही बसमध्ये जवळपास १०० प्रवासी होते. खोडा पोलिसांना ते उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी पोहचून या दोन्ही बस अडवल्या. मात्र, यामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

डीटीसीच्या २ बसना पाठवले परत

माहितीनुसार, या दोन्ही बसमध्ये असलेले जवळपास १०० प्रवासी हे कामगार आहेत. ज्यांना कश्मीरी गेटपासून गाजीपूरच्या शेल्टर होममध्ये हलवण्यात येत होते. त्यांना ज्या बसमधून नेण्यात आले, त्यावेळी त्यात दिल्ली पोलिसांचा एक कॉन्स्टेबलही सोबत होता. मात्र, दिल्ली-युपी सीमेवर या दोन्ही बसेसना अडवण्यात आले. दरम्यान, दिल्ली पोलीसही मोठ्या संख्येने येथे पोहोचली आणि त्यांचात बाचाबाची सुरू झाली.

मात्र, दुसरीकडे या सर्व प्रकरणावर बोलताना अधिकाऱ्यांनी बसेसना अडवण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले, आणि पोलिसांमधील तणावबाबत बोलताना त्यावर पडदा टाकला. तर, गाझियाबादच्या पोलिसांनीही यावर बोलणे टाळले. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, येथील वातावरण चांगलेच चिघळले होते. तर, त्या दोन्ही बसदेखील तेथेच अडवण्यात आल्या होत्या आणि नंतर त्यांना परत पाठवण्यात आले.

काही दिवसांआधी लॉकडाऊनमुळे अचानक हजारो स्थलांतरित मजूरवर्ग, कामगार घरी परतताना हे दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोहोचले होते. ज्यामुळे त्याठिकाणी गर्दी झाली. मात्र, यावेळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना गर्दी आटोक्यात आणताना खुप त्रास झाला. तसेच दिल्लीवरून या स्थलांतरित कामगार, मजुरवर्गाला उत्तर प्रदेशच्या सीमेवर सोडण्यात आल्याचीही माहिती होती. याबाबत या सर्व मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गाझियाबाद आणि नोएडा पोलिसांनी घेतली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details