भोपाळ - काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. यामध्ये १९ आमदार काँग्रेसचे आहेत. यातील १० आमदार आणि ३ मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यप्रदेशातील बंडखोर १० आमदार आणि ३ मंत्री भाजपमध्ये जाण्यास तयार नाहीत - सूत्र - भाजप- काँग्रेस मध्यप्रदेश
नवीन पक्ष स्थापन करण्याची मागणी आमदारांनी केली आहे. आम्ही महाराजांसोबत म्हणजेच सिंधिया यांच्यासोबत बाहेर पडलो होतो. भाजपमध्ये जाण्यासाठी पक्षातून बाहेर पडलो नाही, असे काही आमदार म्हणत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
राजीनामा दिलेले आमदार