नवी दिल्ली - अरबी समुद्रातील 'वायू' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याने चीनच्या १० जहाजांनी भारताचा आश्रय घेतला आहे. या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरागाहवर आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के. आर. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली. 'भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे,' असे त्यांनी सांगितले.
‘वायू’च्या सावटाखाली चीनची दहा जहाजे भारताच्या आश्रयाला
या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरागाहवर आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के. आर. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली. 'भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे,' असे त्यांनी सांगितले.
'अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल आहे. त्यामुळे वायू हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागास १३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे. तर आगामी २४ तासांमध्ये हे वादळ अधिकच गतिमान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ते गुजरातच्या वेरावलजवळ धडकू शकते. त्यावेळी या वादळाची गती ११० ते १३५ किलोमीटर प्रतितास असू शकते,' असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
वायू वादळाच्या तडाख्याने नुकसान होण्याची शक्यता असल्याने येथील लोकांच्या मदतीसाठी वायुसेनेचे एक विमान नवी दिल्लीहून विजयवाडा येथे एनडीआरएफच्या १६० जवानांना घेण्यास जात आहे. हे जवान गुजरातमध्ये वायू चक्रीवादळात सापडणाऱ्या नागरिकांना मदत करणार आहेत.