महाराष्ट्र

maharashtra

Bharat Jodo Yatra Today : भारत जोडो यात्रेला अवंतीपोरा येथून सुरुवात, मेहबूबा मुफ्ती झाल्या यात्रेत सामील

By

Published : Jan 28, 2023, 10:32 AM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता आपल्या शेवटच्या टप्यात पोहचली आहे. आज जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरा भागातील चुरसू येथून यात्रेला सुरुवात झाली. काल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बनिहालमध्ये भारत जोडो यात्रेत भाग घेतला होता.

Bharat Jodo Yatra Today
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथून पुन्हा सुरू झाली आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती देखील या यात्रेत राहुल गांधींसोबत सामील झाल्या. भारत जोडो यात्रेच्या 134व्या दिवशी राहुल गांधी यांनी अवंतीपोरा भागातील चुरसू येथून पायी पदयात्रा सुरू केली. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेराही आज यात्रेत सामील होणार आहेत. काँग्रेसच्या जम्मू काश्मीर युनिटचे अध्यक्ष विकार रसूल वाणी म्हणाले की, आजच्या यात्रेत महिलांचा जास्तीत जास्त सहभाग दिसून येईल.

'ज्यांना यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांना सुविधा द्या' : अवंतीपोरा, पुलवामा येथील जम्मू आणि काश्मीर काँग्रेसचे नेते गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, 'शुक्रवारी हजारो लोक यात्रेत सहभागी होऊ इच्छित होते. मात्र त्यावेळी काही तरी गैरव्यवस्थापन घडले. बोगद्याच्या पलीकडून लोक आल्याचेही सांगण्यात आले. हे निराधार आहे. बोगदा 9 किमी लांबीचा आहे. ते दक्षिण काश्मीरमधील डोरू मतदारसंघातील स्थानिक होते आणि ते इथे राहुल गांधींवरील प्रेमाने आले होते. ज्यांना यात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनाही सुविधा द्याव्यात असे माझे आवाहन आहे'.

श्रीनगरमध्ये गर्दीची अपेक्षा : काँग्रेस अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुढील दोन दिवसांत यात्रेत मोठी गर्दी येणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणाऱ्या समारोप सोहळ्यातही गर्दी होऊ शकते. ते पुढे म्हणाले, 'बिर्ला इंटरनॅशनल स्कूल पंपोरजवळ यात्रा चहापानास ब्रेक घेईल आणि यात्रेचा रात्रीचा थांबा श्रीनगरच्या बाहेरील पंथा चौकातील ट्रक यार्डमध्ये असेल. श्रीनगरमधील यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की, उद्या पंथा चौकातून यात्रेला सुरुवात होणार आहे. राहुल गांधी नेहरू पार्कपर्यंत चालत जातील आणि तेथे पत्रकार परिषद घेतील. सोमवारी (३० जानेवारी) रॅली होणार असून या रॅलीत समविचारी पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

ओमर अब्दुल्लाही यात्रेत सहभागी : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही बनिहालमध्ये भारत जोडो यात्रेत भाग घेतला. राहुलसारखा पांढरा टी-शर्ट परिधान करून उमर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे हजारो समर्थक राहुलसोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. श्रीनगरपासून 120 किमी अंतरावर असलेल्या बनिहालमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उमर म्हणाले, 'भारत जोडो यात्रेचा उद्देश राहुल गांधींची प्रतिमा सुधारणे नसून देशाच्या सद्यस्थितीत बदल घडवून आणणे हा आहे.' त्यांना देशाच्या प्रतिमेची काळजी असल्याने ते या यात्रेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ओमर म्हणाले, 'आम्ही कोणा एका व्यक्तीच्या प्रतिमेसाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी यात सहभागी होत आहोत. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारणांसाठी यात्रा काढली नाही, परंतु देशात जातीय तणाव निर्माण करण्याच्या आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या कथित प्रयत्नांबद्दल त्यांच्या चिंता लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.'

हेही वाचा : Omar Abdullah in Bharat Jodo Yatra : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी, सुरक्षेतील त्रुटीमुळे थांबवली यात्रा

ABOUT THE AUTHOR

...view details