नवी दिल्ली -एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसाठी व्हॅक्सिनच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे. गुलेरिया यांनी म्हटले आहे, की कोविडच्या नव्या व्हेरिएंट्ससाठी बूस्टर डोसची गरज पडू शकते कारण काळानुसार इम्यूनिटी कमजोर होऊ शकते.
भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते, असे संकेतही एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचे पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी सांगितलं की, माझ्या माहितीप्रमाणे जायडस कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊ शकते. पहिली ट्रायल 12-18 वर्षे वयोगटासाठी केली गेली. त्यानंतर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर लसींची ट्रायल केली गेली. आता 2 ते ते 6 वयाच्या मुलांवर ट्रायल केली जात आहे.