मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऐतिहासिक पाऊल उचलत गुरुवारी भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समान सामना शुल्क जाहीर केले. (equal pay for cricketers). बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली.
BCCI : आता महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन; बीसीसीआयची घोषणा
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऐतिहासिक पाऊल उचलत गुरुवारी भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समान सामना शुल्क जाहीर केले. (equal pay for cricketers). बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली.
जय शाह यांचे ट्वीट: जय शाह आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे पहिले पाऊल घोषित करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन इक्विटी धोरण लागू करत आहोत. भारतीय क्रिकेट लिंग समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.
बीसीसीआयचे सचिव शाह यांनीही करार केलेल्या खेळाडूंच्या नवीन फीवर प्रकाश टाकला आणि भारतीय महिला क्रिकेट संघ त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच मॅच फी मिळवेल यावर भर दिला. आणखी एका ट्वीट मध्ये शाह म्हणतात, महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. दोघांनाही कसोटीत 15 लाख रुपये, वनडेत 6 लाख रुपये आणि टीट्वेंटीसाठी 3 लाख रुपये. पे इक्विटी साठी माझी आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी बांधिलकी होती आणि मी एपेक्स काउंसिलचा त्यांच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे. जय हिंद.