महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आता पुन्हा राडा; PUBG चं भारतात कमबॅक, भारतीय व्हर्जन 'बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया' अधिकृतपणे लाँच - Krafton

अखेर आज PUBG चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. पब्जी मोबाईल भारतामध्ये 'बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया' (Battlegrounds Mobile India) या नावाने लाँच झाले आहे. आता या गेमला तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता.

Battlegrounds Mobile India
बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया

By

Published : Jul 2, 2021, 12:22 PM IST

नवी दिल्ली -PUBG गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका देत 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. त्यात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपचाही समावेश होता. त्यानंतर PUBG Mobile गेम भारतात परतणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज PUBG चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. पब्जी मोबाईल भारतामध्ये 'बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया' (Battlegrounds Mobile India) या नावाने लाँच झाले आहे. आता या गेमला तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता.

क्राफ्टोन कंपनीने 'बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया' नावाने गेम लाँच केला आहे. पब्जीची मालकी असलेल्या क्राफ्टोन कंपनीने वैयक्तिक गोपनीयता आणि डाटा सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले.

सध्या हा गेम सध्या केवळ अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यासाठी आयओएस युजर्संना थोडी वाट पाहावी लागेल. अँड्रॉइड फोन युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून हा गेम डाऊनलोड करू शकतात. हा गेम खास भारतात लाँच झाला आहे.

पब्जीवर भारताने घातली होती बंदी-

दरम्यान, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्याकरता भारताने 2 सप्टेंबर 2020 ला 111 मोबाईल अॅपवर बंदी लागू केली होती. त्यामध्ये पब्जीचाही समावेश होता. पब्जीचे जगात 60 कोटी डाऊनलोड आणि 5 कोटी सक्रिय वापरकर्ते आहे. तर भारतामध्ये 3.3 लाख वापरकर्ते होते.

भारतात सर्वांत जास्त पब्जी गेम -

2017 मध्ये हा गेम लाँच झाला होता. उच्चस्तरीय ग्राफिक्स आणि त्याला दिलेली ऑनलाइन तंत्रज्ञानाची जोड या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे लाँच झाल्यानंतर काहीच दिवसात तो सर्वांत लोकप्रिय गेम ठरला होता. या गेमध्ये एकाचवेळी 100 जणांना लढता येत होते. तर जो शेवटी जिंकेल त्याला गेममध्ये चिकन डिनर मिळायचा. पब्जी हा सर्वाधिक विक्रीचा गेम ठरला होता. बॅटल रॉयल टायटल गेम पब्जीने वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जवळपास 9 हजार 731 कोटी रुपये जागतिक उत्पन्न मिळवले होते. पब्जी गेम भारतात सर्वांत जास्त डाऊनलोड करण्यात आला आहे

हेही वाचा -चिनी अ‌ॅपवर बंदी लागू करण्याचे खरे कारण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details