लखनौ bareilly car fire accident - उत्तर प्रदेशमधील रायबरेलीत नैनीताल मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजता कार आणि डम्परचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ८ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला.
नैनीताल मार्गावरील अपघाताची माहिती मिळताच बरेलीचे पोलीस उपअधीक्षक आणि बरेलीमधील पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील प्रवाशांचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांना तीन प्रवाशांची ओळख पटली आहे. डम्परमधील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.अपघातग्रस्त कार ही नारायण नगला येथील फुरकान यांनी बुक केली होती. अपघात होताच डम्पर चालक फरार झाला. बरेलीचे पोलीस उपअधीक्षक सुशील चंद्रभान म्हणाले, बरेलीवरून बहेडीला येत असताना हा अपघात झाला. मृत आरिफ याचे लग्न ८ दिवसापूर्वी झाले होते. मृतामधील सर्व प्रवाशी हे जामनगरमधील रहिवाशी होते.
लॉक न उघडल्यानं ८ जणांचा मृत्यू-मृतामधील प्रवाशी हे भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरेली नैनीताल महामार्गावरील गावाचे रहिवाशी होते. लग्न समारंभावरून ते घरी परतत होते. रस्त्यात कारचे टायर फुटल्यानं चालकाला कारवर नियंत्रण मिळविणं शक्य झाले नाही. अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून डम्परला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारनं काही क्षणातच पेट घेतला. मात्र, कारचे सर्व दरवाजे लॉक होते. आग लागली असताना कारमधून पडता न आल्यानं आठ जणांचा जळून मृत्यू झाला. यामध्ये एका मुलाचाही समावेश आहे. कार आणि डम्परचा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्नीशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.
अपघात झाल्यानंतर प्राण वाचविण्याकरिता काय करता येते?अपघात झाल्यानंतर कार पेट घेण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सिटबेल्ट आणि कारचे दरवाजे लॉक होतात. त्यामुळे वेळीच कारमधून बाहेर पडण्यासाठी काही साधनं ठेवणं आवश्यक असतं. कारची कार तोडण्यासाठी विंडो ग्लास ब्रेकर बाजारात उपलब्ध आहे. या ग्लास ब्रेकरनं कारच्या खिडक्यांची काच तोडून अपघाताच्या वेळी बाहेर पडता येते. अपघाताच्या वेळी मोठ्यानं किंचाळून मदतासीठी बोलावणं आवश्यक असते. प्रवासात जवळ शिट्टी ठेवली तरी शिट्टी वाजवून तुम्ही परिसरातील लोकांचे लक्ष अपघातग्रस्त कारकडे वेधू शकता. जेणेकरून तुम्हाला अपघाताच्या वेळी मदत मिळू शकते.
हेही वाचा-
- चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरची दुसऱ्या दोन वाहनांना धडक; तीन महिलांचा मृत्यू
- तेलंगणात हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, 2 वैमानिकांचा मृत्यू