महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'I Love Pakistan' लिहिलेले फुगे पंजाबमध्ये शेतात सापडले - Balloon with Pakistani flag

पंजाबच्या एका गावात 'I Love Pakistan' लिहिलेले फुगे सापडले आहेत. सापडेलल्या फुग्यावर 'आय लव्ह पाकिस्तान' आणि पाकिस्तानचा ध्वज छापलेला आहे. हे फुगे रूपनगरच्या संदोया गावातील शेतात सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'I Love Pakistan' लिहिलेले फुगे पंजाबमध्ये शेतात सापडले
Balloons with Pakistani flag & 'I love Pakistan' imprinted on it found from Rupnagar in Punjab

By

Published : Aug 16, 2021, 11:54 AM IST

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंजाबच्या एका गावात 'I Love Pakistan' लिहिलेले फुगे सापडले आहेत. सापडेलल्या फुग्यावर 'आय लव्ह पाकिस्तान' आणि पाकिस्तानचा ध्वज छापलेला आहे. हे फुगे रूपनगरच्या संदोया गावातील शेतात सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पंजाबच्या एका गावात 'I Love Pakistan' लिहिलेले फुगे सापडले आहेत.

फुगे सापडलेल्या ठिकाणापासून पाकिस्तानची सीमा जवळच आहे. त्यामुळे पाकिस्तानातून हे फूगे उडत इकडे आले असावे. कारण, भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारत हे दोन देश निर्माण झाले. त्यामुळे 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. पाकिस्तानात साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाचे हे फुगे असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. तरीही याप्रकरणी तपास सुरू असल्याचे रुपनगरचे एसएसपी अखिल चौधरी यांनी सांगितले.

14 ऑगस्ट 1947 भारताची फाळणी -

अखंड भारताची 14 ऑगस्ट रोजी फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण सीमांची घोषणा मात्र 17 ऑगस्टला करण्यात आली. भारताची फाळणी ही काही एका दिवसात अथवा रात्रीत झालेली घटना नाही, यामागं मोठा इतिहास आहे. हा इतिहास ब्रिटिशांच्या कुटील कारस्थानांचा आणि अतिरेकी मुस्लीम जातीय वादाचा होता.

फाळणीच्या वेदना घेऊन आजही प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक यांत एकमेकांबद्दल तिरस्कार असल्याचा दिसून येतो. 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र होत असलेल्या भारतात सर्वत्र आनंदोत्सव होता, मात्र हा आनंद निर्भेळ नव्हता. कारण इंग्रज देश सोडून चालले होते, मात्र, अखंड भारताची फाळणी करून एक भळभळती जखम सर्व भारतीयांच्या उरावर करूनच ते गेले होते.

हेही वाचा -फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची- शिवसेना

हेही वाचा -पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा डीएनए, युनेस्कोच्या बैठकीत भारताने केली पाकिस्तानची पोलखोल

हेही वाचा -VIDEO : पांढरा ध्वज फडकावत पाकिस्तान सैन्याने जवानांचे मृतदेह नेले माघारी

ABOUT THE AUTHOR

...view details