भोपाळ :बागेश्वर धाम बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा बाहल करण्यात आली आहे. त्यांना सुरक्षा देण्याची मागणी बिहार राज्यात सुरू झाल्यापासूनच जोर धरू लागली होती. बिहारचे माजी डीजी (नागरी संरक्षण) आयपीएस अरविंद पांडे यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली. यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांना वाय Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाल्याचे अनेक पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र प्रत्यक्षात बुधवारी केंद्र सरकारने त्यांना वाय श्रेणी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ते देशातील कोणत्याही राज्यात गेल्यास त्यांना वाय श्रेणीत सुरक्षा दिली जाणार आहे. हे परिपत्रक भोपाळच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलीस महानिरीक्षकांनी जारी केले आहे.
काय आहे आदेश :पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला आहे. पंडित धीरेंद्र गर्ग कृष्ण शास्त्री, बागेश्वर धाम बाबा यांना सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्यांना पाठवलेल्या परिपत्रकात पंडित धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या राज्यांच्या तरतुदीनुसार वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यास या आदेशात नमूद करण्यात आले आहे.