महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bageshwar Dham Sarkar : नागपूर प्रकरणावरून पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे वक्तव्य, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू - रायपूरमधील गुढियारी

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 17 जानेवारी ते 23 जानेवारी असे सात दिवस रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री प्रवचन देण्यासाठी रायपूरमध्ये पोहोचले आहेत. बुधवारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नागपूरमधील वादग्रस्त विधानाबाबत सफाई दिली आहे.

Pandit Dhirendra Krishna Shastri
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

By

Published : Jan 19, 2023, 10:30 AM IST

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री

रायपूर (छत्तीसगढ) : छत्तीसगढची राजधानी रायपूरमधील गुढियारी दहीहंडी मैदानावर सात दिवसांपासून बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नागपूरमधील प्रकरण काय? : बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींची गेल्या आठवड्यात नागपूरातील रेशीमबागमध्ये रामकथा आयोजित करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर प्रश्नचिन्ह उठवत धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना ३० लाख देऊ, असे आव्हान देखील अंनिसकडून देण्यात आले आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, धर्मांतर रोखण्यासाठी अंतर्गत आणि ग्रामीण भागात नवीन विचारधारा आणण्यासाठी दर 2 महिन्यांनी 3 दिवसांची कथा आयोजित केली जात आहे. अशा प्रकारे अनेक ख्रिश्चनांना जे हिंदू धर्म सोडून गेले होते त्यांना हिंदू धर्मात परत आणले आहे. भविष्यातही अशा अखंड कथांचे आयोजन केले जाईल. जो लोक सनातन धर्माच्या विरोधात काम करत आहेत त्यांना यामुळे त्रास होत आहे. सनातनी पूर्णपणे अहिंसक आहेत.'

'आम्ही अंधश्रद्धेचे समर्थन नाही' : नागपुरातील कथेदरम्यान वादग्रस्त वक्तव्यावर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, 'आमची कथा 7 दिवसांची होती. आम्ही कथा सोडून पळून गेलो नाही. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे आरोप करत आहेत ते शुद्र मनाचे लोक आहेत. रायपूर मध्ये सुद्धा 9 दिवसांची कथा होती जी 7 दिवसांची झाली आणि आम्ही फक्त 7 दिवस कथा करतो. आम्ही प्रेमाचा प्रचार करतो. आम्ही असा दावा करत नाही की आम्ही तुमची समस्या सोडवेल पण आमचा आमच्या इच्छेवर विश्वास आहे आणि आम्ही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही'.

'मी देव नाही': पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की 'मी देव नाही. मी असे म्हणत नाही की मी समस्या सोडवू शकतो. आपले दैवत आपले प्रश्न सोडावतो. हनुमानजींची पूजा करून त्यांचा प्रचार करण्यात गैर काय आहे? सनातन धर्माला लक्ष्य करण्याचे हे सुनियोजित षडयंत्र असून आम्ही कायद्याचे उल्लंघन केले नाही आणि करणार नाही असेही ते म्हणाले. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत ते म्हणाले की, 'विराट कोहली आपल्या कुटुंबासह वृंदावन येथे बाबा नीम करौलीच्या दर्शनासाठी गेला होता. तेथील ऋषींचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याने दोन शतके झळकावली.' यासोबतच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकाबाबत ते म्हणाले की, 'दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे'. ते म्हणाले की, न पाहता एखाद्यावर विश्वास ठेवणे यालाच अंधश्रद्धा म्हणतात. वैदिक परंपरेनुसार देवावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. माणूस स्वतःला देव म्हणवून घेतो हीअंधश्रद्धा आहे.

हेही वाचा :ANS challenge Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर गंभीर आरोप; चमत्कार सिध्द करा 30 लाख मिळवा, अंनिसचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details