म्हैसूर - योगसाधकाने तब्बल 42 मिनीटे कडक उन्हात एकटक सुर्याकडे पाहण्याचा विक्रम केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बदरी नारायण असे सुर्याकडे एकटक 42 मिनीटे पाहुन विक्रम करणाऱ्या साधकाचे नाव आहे. त्याने ही विक्रम शहरातील किल्ले अंजनेय मंदिरासमोर केला. बदरी नारायण याला सलग सुर्याकडे पाहुन विश्वविक्रम करायचा असल्याचे त्याने सांगितले आहे.
बदरी नारायणने आईच्या प्रेरणेवरुन केला विक्रम :बदरी नारायण यांनी हा विक्रम आपल्या आईच्या प्रेरणेवरुन केल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतला दिली. रथ सप्तमीला बदरी नारायणच्या आईचा वाढदिवस असतो. त्यामुळे हे साहस मी माझ्या आईला समर्पित करत असल्याचेही बदरी नारायणने यावेळी सांगितले. मी माझ्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हा विक्रम मी माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्राचीन स्थळांवर योग :बदरी नारायण यांनी आतापर्यंत देशासह परदेशातीलही अनेक प्राचीन स्थळांवर योग केले आहेत. यात त्यांनी 1,300 पेक्षा जास्त प्राचीन स्थळांवर शिर्षासन योग केले आहेत. यात कंबोडिया, मलेशिया आणि भारतातील अनेक प्राचीन स्थळांचाही समावेश आहे. त्यांच्या साहसासाठी अनेक संस्थांनी त्यांना लिंक अवॉर्ड, आशिष वर्ल्ड रेकॉर्ड, एलिट वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.