पाटणा (बिहार) : जन्मलेल्या बाळाला दोन हात, दोन पाय असतात, हा निसर्गाचा नियम आहे. मात्र चक्क चार कान, चार पाय, चार हात, दोन हृदय असलेल्या चिमुकलीचा जन्म झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना छपरा येथील संजीवनी नर्सिंग होममध्ये उघडकीस आली. प्रिया देवी नावाच्या महिलेने या चार हात, चार पाय, चार कान असलेल्या चिमुकलीला जन्म दिला होता. मात्र दुर्दैवाने त्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
हे त्या महिलेचे पहिले अपत्य होते. ऑपरेशननंतर मुलीला बाहेर काढण्यात आले. हे बाळ सामान्य नव्हते. काही प्रकरणांमध्ये असे घडते. सध्या या महिलेची प्रकृती चांगली आहे. जन्मानंतर 20 मिनिटांनी नवजात बाळ मृत झाले आहे - डॉ. अनिल कुमार, रुग्णालयाचे संचालक
फक्त 20 मिनिटे जीवंत राहिली चिमुकली :बिहारमधील छपरा येथील जिल्ह्यातील संजीवनी नर्सिंग होममध्ये प्रिया देवी या महिलेने एका विचित्र बाळाला जन्म दिला. या मुलीची माहिती रुग्णालयात उपस्थित कर्मचारी व रुग्णांना मिळताच मोठी खळबळ उडाली. या विचित्र मुलीला डोके, चार कान, चार पाय, चार हात, दोन हृदय आणि दोन पाठीचा कणा आहे. जे पाहून रुग्णालयातील कर्मचारीही हैराण झाले. सुमारे 20 मिनिटे जीवंत राहिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला.
जुळी मुले जन्माला येताना झाला गोंधळ : विचित्र बाळ जन्माला आल्यामुळे रुग्णालयाचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी हे फार कमी लोकांमध्ये दिसून येते. जेव्हा गर्भाशयात एकाच अंड कोशापासून दोन मुले तयार होतात तेव्हा असे घडते. या प्रक्रियेत दोघेही वेळेत वेगळे झाले तर जुळी मुले जन्माला येतात. परंतु काही कारणाने दोघेही वेगळे होऊ शकत नाहीत, अशा स्थितीत अशी मुले जन्माला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशनद्वारे बाळाचा जन्म : अशा बाळाच्या जन्माच्या वेळीही गर्भवती महिलेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ऑपरेशनद्वारे बाळाचा जन्म झाला असला तरी 20 मिनिटांत तिचा मृत्यू झाला. प्रसूती झालेल्या महिलेचे हे पहिलेच अपत्य असल्याचे डॉ अनिल कुमार यांनी सांगितले. मुदत संपल्यानंतर बाळाच्या जन्माची चिंता सतावत होती. तपासणीनंतर ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला आणि मुलीला बाहेर काढण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती चांगली असल्याचे डॉ अनिलकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.