महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Baba Ramdev Holi Of Flowers : बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी

बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठाची होळी खास आहे. यावेळी पतंजली विद्यापीठाच्या क्रीडा मैदानातही विशेष होळीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 'होलिकोत्सव यज्ञ'असे नाव देण्यात आले. योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बालकृष्ण यांनी यक्ष पूर्ण केल्यानंतर फुलांची होळी खेळली. कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्व विद्यार्थी व साधक फुलांच्या होळीच्या रंगात रंगून गेले होते.

Baba Ramdev Holi Of Flowers
बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी

By

Published : Mar 8, 2023, 4:21 PM IST

भक्तांना संबोधित करतांना बाबा रामदेव

उत्तराखंड :भारतात सर्वत्र रंगपंचमी खेळली जात आहे. लहान्यांपासुन मोठ्यांपर्यंत सगळे होळीच्या रंगात दंग झाले आहेत. अश्यातचहरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाच्या क्रीडा मैदानात विद्यापीठाचे कुलपती स्वामी रामदेव आणि कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांच्या उपस्थितीत 'होलिकोत्सव यज्ञ' आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी उपस्थित सर्व मुलांसह आणि भाविकांसह होळी साजरी केली आणि फुलांची होळी खेळून सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी

पतंजली योगपीठावर फुलांची होळी : होळी उत्सवात पतंजली विद्यापीठ, पतंजली आयुर्वेद महाविद्यालय, पतंजली गुरुकुलम, आचार्यकुलम, पतंजली संन्यासाश्रमचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, भिक्षू बांधव आणि साध्वी उपस्थित होत्या. यादरम्यान स्वामी रामदेव यांनी प्रत्येकाला आत्मवृद्धी, आत्मविस्मरण, आत्मसंमोहन इत्यादी गोष्टी होऊ देऊ नका, असे आवाहन केले. सदैव तुमच्या खऱ्या मार्गावर, सनातनच्या मार्गावर, वेदांच्या मार्गावर, सत्याच्या मार्गाने पुढे जात राहा.

बाबा रामदेव यांनी नीतिमत्तेच्या युक्त्या सांगितल्या: बाबा रामदेव म्हणतात की, 'आत्म-वृद्धि, आत्म-विस्मरण, आत्म-संमोहन इत्यादींना परवानगी देऊ नये. सदैव सत्यावर आधारीत राहून, आपल्या खऱ्या मार्गावर, सनातन धर्माच्या मार्गावर, वेदांनी दाखवलेल्या मार्गावर, ऋषीमुनींनी दाखवलेल्या मार्गावर सदाचारीने वाटचाल करत रहा. बाबा रामदेव म्हणाले की, 'नवनवीन पावले चालत राहा, विकास करत राहा. सत्य हे आहे की ज्यांच्या आयुष्यात सक्षम गुरु असतात त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस होळी आणि दिवाळी असतो.

बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी

बाबा रामदेव यांनी विद्यार्थ्यासाठी गुरूचे महत्त्व स्पष्ट केले: अशा सक्षम गुरूच्या सहवासात, पतंजलीच्या गुरुकुलमच्या आमच्या लहान मुला-मुलींपासून आचार्यकुलमच्या सर्व हुशार सक्षम मुलांपर्यंत, पतंजली विद्यापीठ, पतंजली आयुर्वेद महाविद्यालयातील आमच्या सर्व आचार्यांपर्यंत पतंजली सन्यास आश्रमात, ब्रह्मचारींचा विकास शक्य आहे. आपल्या सर्व ब्रह्मवादिनी भगिनी आणि मुली इथे जीवनाच्या नवीन पायऱ्या खूप धार्मिकतेने चढत आहेत आणि जीवनात आणखी प्रकाश पसरवत पुढे जात आहेत.

हेही वाचा : Papmochani Ekadashi 2023: कधी असते पापमोचनी एकादशी ? शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि महत्त्व जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details