राक्षसांना मारण्यासाठी मी माझी तलवार काढलीय अयोध्याAyodhya Saint Jagatguru on Udhayanidhi:तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिनयांनी सनातन धर्माची तुलना डास व मलेरियाशी करत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपामधील नेते संतप्त झाले आहेत. अयोध्येतील तपस्वी छावणी येथील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनीदेखील उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
परमहंस आचार्य यांनी सोमवारी दुपारी उदयनिधी स्टॅलिन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलय. एवढ्यावर न थांबता त्यांनी स्टॅलिन यांचे पोस्टर तलवारीनं कापलं. स्टॅलिनचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण १० कोटींचे बक्षीस देऊ, अशी त्यांनी वादग्रस्त घोषणा केलीय.
त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल-उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाचा जगतगुरू परमहंस आचार्य यांच्यासह इतरांनी जोरदार निषेध केला. माध्यमांशी बोलताना आचार्य म्हणाले, उदयनिधी स्टॅलिनचे वडील एम. के. स्टॅलिन हे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. ही आघाडी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र, या आघाडीतील बड्या नेत्याच्या मुलाच्या विधानावरून इंडियाचे नेते देशातील 80 टक्के लोकसंख्येसाठी काय विचार करतात, हे दिसून आलय. इंडिया आघाडीचे नेते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही सनातन धर्माला संपवण्याचं कारस्थान झालं होतं. तेव्हा अशा पापी राक्षसांना मारण्यासाठी मी माझी तलवार काढलीय. उदयनिधी जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेल, असा इशारा परमहंस आचार्य यांनी दिलाय.
द्रमुकला हिंदूंप्रती द्वेष-जनसत्ता लोकतांत्रिक दलाचे प्रमुख आणि प्रतापगडच्या कुंडा येथील आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया म्हणाले, प्रत्येक भारतीयाने स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली. स्टॅलिन यांच्या वक्तव्यातून द्रमुकला हिंदूंप्रती असलेला द्वेष दिसून येत असल्याचा आरोप आमदार रघुराज प्रताप सिंह यांनी केला. इंडिया आघाडी ही द्रमुकशी युती करणार का, हे स्पष्ट करावे असे रघुराज प्रताप सिंह यांनी म्हटलयं.
हेही वाचा-
- Udhayanidhi Stalin On Sanatan Dharma : सनातन धर्म संपुष्टात आणलाच पाहिजे, मी माझ्या विधानावर ठाम - उदयनिधी स्टॅलिन
- Udhayanidhi Stalin : मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा प्रताप; 'सनातन धर्मा'ची तुलना 'डास' आणि 'मलेरिया'शी