महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SpiceJet Mumbai-Durgapur flight : मुंबई-दुर्गापूर विमानाला वातावरणाचा अडथळा;13 जण जखमी - मुंबईहून दुर्गापूर विमानाला वातावरणाचा अडथळा

मुंबईहून दुर्गापूरला निघालेल्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 विमानाला रविवारी लँडिंग करताना वातावरण बदलाची अडचण आली. विमानाच्या हेलकाव्याने विमानातील सामान प्रवाशांच्या अंगावर पडू लागले. यामध्ये 13 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

SpiceJet Mumbai-Durgapur flight
SpiceJet Mumbai-Durgapur flight

By

Published : May 2, 2022, 8:57 AM IST

Updated : May 2, 2022, 1:08 PM IST

मुंबई - मुंबईहून दुर्गापूरला निघालेल्या स्पाईसजेटच्या बोईंग B737 विमानाला वातावरणाचा अडथळा आला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे विमानात खळबळ उडाली. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ( SpiceJet Mumbai-Durgapur flight ) विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान नंतर दुर्गापूर येथे सुरक्षितपणे उतरले आहे. तसेच, जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना, विमान कंपनीने सांगितले की, सर्व जखमी प्रवाशांना सर्व शक्य वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील.

व्हिडीओ

स्पाईसजेटच्या बोईंग B737 विमानानेमुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर उड्डाण केले. विमान लँड करण्याच्या तयारीत असतानाच ते वातावरणातील तीव्र हवामान बदलात ते अडकले. दरम्यान, स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, "1 मे रोजी, स्पाईसजेटचे बोईंग B737 विमान मुंबई ते दुर्गापूर हे फ्लाइट SG-945 चालवत असताना विमानतळावर लँडिंग करत असताना त्यात वातावरणाचा गंभीर गडबड झाली, ज्यामुळे दुर्दैवाने काही प्रवासी जखमी झाले आहेत.


एअरलाइनने म्हटले आहे- "रविवारी स्पाईसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानाच्या गंतव्य विमानतळावर उतरताना प्रचंड गोंधळामुळे प्रवासी जखमी झाले. तथापि, बोईंग B737 विमान सुरक्षितपणे उतरण्यात यशस्वी झाले आणि जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली आणि गरज पडल्यास त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.


स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज, स्पाईसजेट बोईंग B737 विमानाचे उड्डाण SG-945 चे मुंबई ते दुर्गापूर येथे लँडिंग करताना समस्या आली, ज्यामुळे काही प्रवाशांना दुखापत झाली," असे स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे.


विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, जखमी प्रवाशांना दुर्गापूरला पोहोचताच त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे हे विमान बोइंग बी737 होते. ते मुंबईहून पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला गेले. विमान अचानक उतरणार असतानाच प्रवाशी गोंधळात दिसले.

हेही वाचा -Raj Thackeray Full Speech Aurangabad : राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सभेतील संपूर्ण भाषण जसेच्या तसे..

Last Updated : May 2, 2022, 1:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details