महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात; सहलीला जाणाऱ्या 12 जणांचा मृत्यू

Major Accident in Assam : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. पिकनिकला जाणाऱ्या बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झालाय.

Major Accident in Assam
Major Accident in Assam

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 10:43 AM IST

गुवाहाटी Major Accident in Assam : आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघात झालाय. प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. डेरगावच्या बालीजान भागात पिकनिकला जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेली मिनी बस एका ट्रकला धडकली. यात 12 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रं. 37 वर सकाळी 5 च्या सुमारास घडलाय.

अपघातात 12 जणांचा मृत्यू : गोलाघाटचे पोलीस अधीक्षक राजेन सिंह यांनी सांगितलं की, आज सकाळी डेरगावजवळील बालीजानमध्ये 45 जणांना घेऊन जाणारी बस एका मालवाहू वाहनाला धडकल्यानं हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी बस अप्पर आसामच्या दिशेनं जात होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक तपशील नंतर समोर येईल, असंही सिंह यांनी सांगितलंय. जोरहाट वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी 30 जखमींवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याचही त्यांनी सांगितलंय.

पिकनीकला जाणाऱ्या बसला भीषण अपघात : बसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी नववर्षानिमित्त पिकनिकसाठी तिनसुकिया येथील तिलिंगा मंदिरात जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या अपघातातील जखमींवर रहाट मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान यात मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी झारखंडमध्ये भीषण अपघात : नवीन वर्षाच्या दिवशी सकाळी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. झारखंडच्या आरआयटी पोलीस स्टेशन परिसरातील काही लोक कारमधून नवीन वर्षानिमित्त पिकनिकसाठी निघाले होते. या दरम्यान बिस्तुपूर सर्किट हाऊस चौकाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार पलटली. त्यामुळं कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

  1. 100 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेली चिमुकली काढली बाहेर, उपचारादरम्यान झाला मृत्यू
  2. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये मृत्यूचं तांडव; सहलीला जाणाऱ्या सहा मित्रांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details