नवी दिल्ली- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखचे वकील आनंद डागा आणि सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना आज (शनिवारी) रोझ एवेन्यू न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाने दोघांनाही 2 सप्टेंबरला दोन दिवसांकरिता सीबीआयच्या ताब्यात दिले होते.
2 सप्टेंबला सुनावणीत आनंद डागा यांच्यावतीने वकील तनवीर अहमद मीर यांनी अटकेचे प्राथमिक आरोपपत्र (एफआयआर) मागितले होते. जोपर्यंत एफआयआरची कॉपी मिळत नाही, तोपर्यंत आरोपाची माहिती कसे समजेल, असे वकील तनवीर अहमद मीर यांनी न्यायालयात सांगितले. त्यावर सीबीआयने एफआयआरची कॉपी लवकरच दिली जाणार असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा-अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पीएंविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
सुनावणीदरम्यान सीबीआयने म्हटले होते, की सर्च वारंट जारी केले आहे. ते गोपनीय कागदपत्रे आहेत. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनी कागदपत्रे उघड केली आहेत. त्या बदल्यात त्यांनी लाच घेतली आहे. वकील तनवीर अहमद मीर यांनी त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण दिले. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात 24 तासामध्ये एफआयआर कॉपी देण्याचे आदेश दिले होते. त्यावर न्यायालयाने एफआयआर कॉपी आरोपीच्या वकिलाला देण्याची सूचना केली. तिवारी आणि डागा यांना 1 सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यावेळीही वकील मीर यांनी अटक वॉरंटची कॉपी मागितली होती.