महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; अंतरिम जामीन देण्याचे आदेश - अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालय

Arnab Goswami in Supreme Court hearing LIVE Updates
अर्णब गोस्वामी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

By

Published : Nov 11, 2020, 12:06 PM IST

Updated : Nov 11, 2020, 4:29 PM IST

16:22 November 11

५० हजारांच्या जातमुचलक्यावर अर्णबची सुटका

नवी दिल्ली : अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींना जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर या सर्व आरोपींना अंतरिम जामीन देण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

16:19 November 11

अर्णबला अंतरिम जामीन द्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी, तसेच सह-आरोपींना अंतरिम जामीन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

15:15 November 11

मग काय मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का? साळवींचा सवाल

एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी त्याचा गुन्ह्याशी वा घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असायला हवा. उद्या महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे नाव पत्रात लिहून आत्महत्या केली, तर मुख्यमंत्र्यांना अटक करणार का? असा युक्तीवाद अर्णबचे वकील हरीष साळवी यांनी केला.

13:18 November 11

दोन वाजेपर्यंत तहकूब..

सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता दोन वाजता सुरू होणार आहे. तोपर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

13:14 November 11

अर्णब गोस्वामी एक दिवसही तुरुंगात राहू नये - साळवी

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालय उद्या (गुरुवार) निकाल देणार आहे. त्यामुळे हा निकाल जाहीर होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी कोणताही निकाल देऊ नये, अशी विनंती नाईक यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर, अर्णबला एका दिवसाचाही तुरुंगवास व्हायला नको होता असे हरीष साळवी यांनी म्हटले आहे.

12:16 November 11

एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले

"आपल्या देशातील लोकशाही ही विलक्षणरित्या लवचिक आहे. जर देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण एक न्यायालय म्हणून आपण केले नाही, तर कोण करेल?" असे न्यायमूर्ती चंद्रचूड यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारलाही फटकारले आहे. एखादे राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करत असेल, तर त्याबाबत कारवाई करुन एक ठोस असा संदेश सर्वांना देणे सर्वोच्च न्यायालयाला आवश्यक आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

12:02 November 11

सीबीआय चौकशीची मागणी

अर्णब गोस्वामी प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी वरीष्ठ वकील हरीष साळवे यांनी केली आहे. साळवे हे सर्वोच्च न्यायालयात अर्णबची बाजू मांडत आहेत.

12:01 November 11

अर्णब गोस्वामी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली :रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2018 मधील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

काय आहे प्रकरण ?

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस आणि रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गेल्या बुधवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना थेट अलिबाग कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. या निर्णयाला आव्हान देत ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गोस्वामींच्यावतीने हायकोर्टात अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर विस्तृत सुनावणी घेत हायकोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याला आव्हान देत गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

Last Updated : Nov 11, 2020, 4:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details