हैदराबाद Armed Forces Veterans Day : भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करिअप्पा हे 1947 च्या युद्धाचे नायक होते. भारतीय सैन्याला विजय मिळवून देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ते भारतीय सैन्यातून औपचारिकपणे 14 जानेवारी 1953 रोजी निवृत्त झाले. यानंतर 14 जानेवारी 2016 रोजी प्रथमच त्यांच्या सन्मानार्थ सशस्त्र सेना माजी सैनिक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आयोजित केला जातो. निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दिवस दरवर्षी आयोजित केला जातो.
सशस्त्र सेना माजी सैनिक दिनाची पार्श्वभूमी :
- भारतीय सशस्त्र दलांचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा निवृत्त झाल्यामुळं सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
- सशस्त्र दलातील दिग्गजांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आलाय.
- या कार्यक्रमात प्रामुख्यानं सैन्यप्रमुख, नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख उपस्थित राहतात.
- सशस्त्र सेना माजी सैनिक दिन पूर्वी युद्धविराम दिन म्हणून साजरा केला जात होता.
सशस्त्र दलाच्या माजी सैनिकांशी संबंधित तथ्यं :
- सशस्त्र सेना माजी सैनिक दिवस दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
- 1953 मध्ये या दिवशी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा निवृत्त झाले.
- 1947 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात विजयी झालेल्या बहुतांश सैनिकांनी सेवेतून औपचारिकपणे निवृत्ती घेतली.
- हा दिवस शूर मनाच्या माजी सैनिकांच्या निःस्वार्थ कर्तव्याचा सन्मान करण्यासाठी आणि देशासाठी त्यांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या कुटुंबियांशी एकतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
- या वेळी, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांप्रती बांधिलकी आणि एकता दृढ करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी "पुष्पहार अर्पण समारंभ" आयोजित केला जातो.
- यानिमित्त डेहराडून, दिल्ली, जालंधर, चंदीगड, झुंझुनू, पानागढ, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता आणि इतर ठिकाणी शूर सैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केले जातात.
- भारतातील अंदाजे 60,000-70,000 सशस्त्र दलाचे कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात किंवा सक्रिय सेवेतून मुक्त होतात.
- यावेळी वीरमरण आलेल्या निवृत्त सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.
हेही वाचा :
- आता मुलींनाही मिळणार सैनिक शाळेत प्रवेश; सहाव्या वर्गातील प्रवेशासाठी करता येणार अर्ज
- काश्मीरमधून तब्बल दहा हजार सैनिकांना तातडीने बोलावले परत; गृहमंत्रालयाचे आदेश