महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tirupati Crime : थरारक! भावानेच केली भावाची हत्या, कारण जाणून व्हाल थक्क!

आपल्या भावाच्या कथित विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेला वाद सोडवण्याच्या प्रयत्नात एका 35 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला जाळून मारण्यात आले. चित्तूर जिल्ह्यातील वेदुरु कुप्पम मंडलातील ब्राह्मणपल्ली गावात घरून काम करत असलेल्या नागराजूला रिपंजय, चाणक्य प्रताप आणि गोपीनाथ रेड्डी या तिघांनी कथितपणे त्याच्याच कारमध्ये आग लावली. नागराजूला त्याच्याच होंडा कारमध्ये तिघांनी जिवंत जाळले.

Tirupati Crime
भावानेच केली भावाची हत्या, कारण जाणून व्हाल थक्क!

By

Published : Apr 3, 2023, 12:12 PM IST

तिरुपती :नागराजूचा भाऊ पुरुषोत्तमवर रिपंजयच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, या समस्यांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी नागराजू रेड्डी यांच्या माध्यमातून मध्यस्थी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागराजूचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम, जो सॉफ्टवेअर इंजिनियरलदेखील आहे. याने अलीकडेच बंगळुरूमध्ये नोकरी मिळवली आहे.

होंडा कारमध्ये तिघांनी जिवंत जाळले : शनिवारी रात्री पुरुषोत्तम बंगळुरूमध्ये असताना रेड्डी यांनी नागराजू यांना चर्चेसाठी बोलावले. त्यामुळे नागराजू रिपंजय, प्रताप आणि रेड्डी यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी गेले आणि कारमधून बाहेर पडले. पण परिस्थिती चिघळली आणि नागराजूला त्याच्याच होंडा कारमध्ये तिघांनी जिवंत जाळले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नागराजू यांनी रेड्डी यांना संघर्ष टाळण्याची विनंती केली, परंतु चंद्रगिरी आणि आरपी पुरम दरम्यान बोप्पाराजूपल्ली कनुमा येथे परिस्थितीने टोकाचे वळण घेतले आणि हे कृत्य घडले.

तिघांवर गुन्हा दाखल :व्यक्तीचा देह पूर्णपणे जळालेला असल्याने पोलीस घटनास्थळीच शवविच्छेदन करण्याची व्यवस्था करत आहेत. नागराजूची चेन आणि चप्पल सापडली आहे. तिन्ही आरोपी फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. आयपीसी कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावे गायब होण्यास कारणीभूत), कलम 34 (सामान्य हेतूने पुढे जाण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हत्येसाठी नागराजू यांच्याच गाडीतील इंधन वापरले की त्यांनी ते सोबत आणले होते, याचाही तपास पोलीस करत आहेत. यावरून हा गुन्हा तयारी करुनच घडल्याचे स्पष्ट होते. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जळणारी कार पाहिली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ही घटना उघडकीस आली.

जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी : नागराजू यांच्या पत्नी सुलोचना म्हणाल्या की, माझ्या पतीचा धाकटा भाऊ पुरुषोत्तमचे गावातील एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. हा प्रकार कळताच महिलेच्या कुटुंबीयांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या भीतीने माझ्या पतीने माझ्या दीराला बंगळुरूला पाठवले. नंतर माझे पती त्यांच्याशी समेट करण्याचा प्रयत्न करत होते. मी गोपी नावाच्या माणसाला सांगितले की, आपण तडजोड करू आणि माझ्या पतीला यायला सांगितले. तो गेल्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला फोन आला की गाडीला आग लागली आहे. नागराजू यांच्या पत्नी सुलोचना म्हणाल्या की, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझे पती त्यांच्याशी समेट करण्यासाठी आले असता त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना अशा प्रकारे मारण्यात आले. पोलिसांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी.

हेही वाचा :Umpire Killed : धक्कादायक! चुकीच्या निर्णय देणाऱ्या अंपायरची खेळाडूने काढली कायमचीच विकेट...

ABOUT THE AUTHOR

...view details