नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधकांनी महागाई आणि चलनवाढीचा मुद्दा लावून धरला आहे. संसदेबाहेर आणि विरोधकांनी निदर्शने करुन संसदेचे कामकाज अनेकदा सहकूब करण्यास भाग पाडले आहे. संसदेत घोषणाबाजीसह खासदारांनी फलक झळकावून महागाईविरोधात गदारोळ केला (Placard into the House). अनेकदा सभापती ओम बिर्ला यांनी विनंती करुनही विरोधक काही नमायला तयार नाहीत (House proceedings). त्यामुळे आज संसदेत जर कुणी फलक आणून ते झळकवण्याचा प्रयत्न केला तर त्या खासदारांना संसदेच्या कामकाजात सहभग घेता येणार नाही असा सज्जड दम बिर्ला यांनी निदर्शक खासदारांना दिला.
4 खासदारांचे निलंबन - सभागृहात गदारोळ झाल्याने लोकसभेतील काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाई करण्यापूर्वीच आज लोकसभा अध्यक्षांनी इशारा दिला होता. मात्र त्यांच्या सततच्या विनंती आणि इशाऱ्यांनंतरही सभागृहात विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. यानंतर त्यांनी चार खासदारांना निलंबित केले.
ओम बिर्ला यांनी फटकारले - निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये रम्या हरिदास, मणिकम टागोर, टीएन प्रतापन आणि ज्योतिमणी यांचा समावेश आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सोमवारी विरोधी पक्षांना फटकारले. ते म्हणाले की, ते ज्या विषयावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत त्यावर ते चर्चा करणार नाही, मी मात्र चर्चा करण्यास तयार आहे. ते म्हणाले की, हे सभागृह चर्चा आणि संवादासाठी आहे, घोषणाबाजी आणि फलक लावण्यासाठी नाही.