महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

keshavpuram case: केशवपुरम अपघातात दोघांचा मृत्यू, कारने धडक देत 350 मीटरपर्यंत ओढत नेले - keshavpuram case Re run of Kanjhawala accident

कांजवाला प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण दिल्लीत समोर आले आहे. केशवपुरम परिसरात, कार चालवत असलेल्या पाच तरुणांनी स्कूटीने जात असलेल्या दोघांना धडक दिली. दोघांना कार चालकाने खेचून 350 मीटर दूर नेले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. कारमधील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

keshavpuram case Re-run of Kanjhawala accident scooty was hit by a car and was dragged for nearly 350 metres
केशवपुरम अपघातात दोघांचा मृत्यू, कारने धडक देत 350 मीटरपर्यंत ओढत नेले

By

Published : Jan 28, 2023, 6:26 PM IST

केशवपुरम अपघातात दोघांचा मृत्यू, कारने धडक देत 350 मीटरपर्यंत ओढत नेले

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. केशवपुरम परिसरात कारमधून आलेल्या पाच जणांनी स्कूटीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली. यामध्ये एक तरुण जखमी झाला होता, तर दुसऱ्याला कारस्वाराने 350 मीटरपर्यंत ओढून नेले. केशवपुरम पोलिस स्टेशनच्या पीसीआर टीमने सतर्कता दाखवत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कांजवाला प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण दिल्लीत झाल्याने आता पोलिसांच्या नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

चालकासह पाच आरोपी अटकेत:दुचाकी चालकाचा आधीच मृत्यू झाला होता. डीसीपी उषा रंगनानी यांनी या घटनेची माहिती दिली. कारमधील पाचही तरुण दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सर्वांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला असून, चालकासह एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या डीसीपी उषा रंगनानी यांनी सांगितले की, गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्री केशवपुरम पोलिस स्टेशनच्या दोन पीसीआर व्हॅन परिसरात गस्त घालत होत्या.

पोलिसांनी पाठलाग करून आरोपी पकडले:तेव्हाच कन्हैया नगर परिसरातील प्रेरणा चौकात टाटा झेस्ट कारने अ‍ॅक्टिव्हा स्कूटीला धडक दिल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांना दिसले. या स्कूटीवर दोन तरुण बसले होते. त्यातील एक तरुण हवेत उडी मारून गाडीच्या छतावर पडला. त्याचवेळी आणखी एका तरुणाने उडी मारली आणि तो गाडीच्या विंडस्क्रीन आणि बोनेटमध्ये अडकला. तर स्कूटी खाली असलेल्या बंपरमध्ये अडकली. या अपघातानंतर आरोपींनी कार थांबवण्याऐवजी तेथून पळ काढला, परंतु पीसीआरमध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी सुमारे 350 मीटरपर्यंत पाठलाग करून कारमधील पाचही जणांना पकडले.

कारमधील आरोपी होते दारूच्या नशेत:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत कारमधील सर्व प्रवासी दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना घडली तेव्हा सर्वजण लग्न समारंभातून परतत होते. कैलास भटनागर आणि सुमित खारी अशी स्कूटी स्वार तरुणांची नावे आहेत. या अपघातात कैलास भटनागर यांचा वेदनादायक मृत्यू झाला तर आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या, पोलिसांनी कलम 304, 304 ए/338/279/34 अन्वये गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा: Delhi Hit and Run Case कांजवाला प्रकरण पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details