तेलंगाणा -बिग बॉस' या रिअॅलिटी शोवर बंदी ( Bigg Boss reality show ban ) घालण्याच्या याचिकेवर शुक्रवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात ( Andhra Pradesh High Court ) सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याचे वकील शिव प्रसाद रेड्डी यांनी युक्तिवाद केला की, बिग बॉसमध्ये ( Bigg Boss reality show ) खूप अश्लीलता आहे. टीव्ही शो इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन (IBF) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर केंद्र सरकारच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यांने खंडपीठाने पुढील सुनावणी 11 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.
'बिग बॉस' रिअॅलिटी शोमधील अश्लीलतेबाबत उच्च न्यायालयाने फटकारले - Bigg Boss Reality Show Ban
बिग बॉस' या रिअॅलिटी शोवर बंदी ( Bigg Boss reality show ban ) घालण्याच्या याचिकेवर शुक्रवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात ( Andhra Pradesh High Court ) सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने अश्लीलतेवर तीव्र प्रतिक्रिया ( High Court strongly reacted on obscenity ) व्यक्त केली.
पुढील सुनावणी 11 ऑक्टोबरला -न्यायालयाने अश्लीलतेवर तीव्र प्रतिक्रिया ( High Court strongly reacted on obscenity ) व्यक्त केली. यावर केंद्राच्या वकिलांनी स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. हायकोर्टाने सांगितले की, पुढील स्थगितीमध्ये प्रतिवादींना नोटिसांवर निर्णय घेऊ. पुढील सुनावणी 11 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. 1970 च्या दशकात कोणत्या प्रकारचे चित्रपट तयार होत होते. आता कोणत्या प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत, असा सवाल उच्च न्यायालयाने ( High Court slammed reality show Bigg Boss ) केला आहे.
बिग बॉस हा रिअॅलिटी शो नसून तो निकृष्ट शो -बिग बॉसवर बंदी घालण्याची मागणी अनेक जण आधीच करत असल्याची माहिती आहे. आमदार राज सिंह यांनीही बिग बॉसवर बंदी घालण्याची मागणी केला. बिग बॉस हा रिअॅलिटी शो नसून तो निकृष्ट शो असल्याची टीका होत आहे. कुटुंबीयांसह हा कार्यक्रम पाहणे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.