मुंबई -भाजपच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केला. केंद्रीय संसदीय मंडळामध्ये तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. Gadkari Was Dropped From The Parliamentary Board यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, के. लक्ष्मण आणि सर्बानंद सोनोवाल यांचा समावेश आहे. यासह या समितीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष यांचा समावेश आहे. बीएल संतोष यांना केंद्रीय संसदीय मंडळाचे सचिवपद देण्यात आले आहे.
गडकरी बाहेर असताना फडणवीसांना एंट्री भाजपने केलेल्या या बदलातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे नितीन गडकरी यांची संसदीय मंडळातून हकालपट्टी केली आहे. मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळात ते अतिशय लोकप्रिय मंत्री राहिले आहेत. Reconstitution of BJP's parliamentary board रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातील त्यांच्या कामाची बरीच चर्चा झाली आहे. शिवाय, पक्षाच्या माजी अध्यक्षांना संसदीय मंडळात कायम ठेवण्याची परंपरा आहे, जी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या हकालपट्टीनंतरच संपली. मात्र नितीन गडकरींसारख्या सक्रिय आणि तगड्या नेत्याला येथून हटवणे धक्कादायक आहे. मात्र, समतोल साधत भाजपने नितीन गडकरींच्या जागी देवेंद्र फडणवीस यांची बढती करून त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश केला आहे.
काय म्हणाले होते गडकरीदोन आठवड्यापूर्वी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, मला खूप वेळा राजकारण सोडावसे असे वाटते. आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. तसेच, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे असही ते म्हणाले होते. दरम्यान,नितीन गडकरी हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये बाजूला असल्याचे दाखवत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका असो किंवा यंदाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका. प्रचारात किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत ते कुठेच दिसले नाहीत.
एका शीख नेत्याचा संसदीय मंडळात समावेश याशिवाय शिवराज सिंह चौहान यांचीही दीर्घकाळानंतर संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पक्षाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीवर सत्यनारायण जातिया यांचा समावेश केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातही राज्य आणि जाती यांच्यातील समतोल पाहायला मिळतो. भाजपने पहिल्यांदाच इक्बाल सिंग लालपुरा यांच्या रूपाने एका शीख नेत्याचा संसदीय मंडळात समावेश केला आहे. याशिवाय ओबीसी नेता म्हणून हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी देण्यात आली आहे. तर तेलंगणाचे के. लक्ष्मण आणि कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा यांनाही दक्षिण विस्ताराच्या योजनेचे संकेत देण्यात आले आहेत.