महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2023, 7:41 PM IST

ETV Bharat / bharat

Girl dies Mobile Explosion: व्हिडिओ पाहताना मोबाईलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

केरळमध्ये एका मुलीची मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. माजी ब्लॉक पंचायत सदस्य अशोक कुमार यांची आठ वर्षाची ही मुलगी आहे. तीचे नाव आदित्यश्री असे आहे. ती थिरुविलवामला येथील आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहताना आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहताना आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

तिरुअनंतपुरम (केरळ) : प्रत्येकाकडे आज स्मार्ट फोन आहे. यामध्ये लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे. तसेच, घरातील लोकही मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देतात. परंतु, यामुळे काही घटना दुर्दैवी घडतात. या स्मार्ट फोनमुळे घडणाऱ्या वाईट घटनाही वाढल्याचे समोर आले आहे. फोन ब्लास्ट होणं, हा त्यातलाच एक प्रकार. आपल्याला अनेकदा फोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकिवात येत असतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. या घटनेत आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

पाळायन्नूर पोलिसांनी माहिती घेत आवश्यक कारवाई केली : मोबाईमध्ये मुलगी व्हिडिओ पाहत असताना हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आदित्यश्री तिरुविलवामाला पुनरजानी येथील क्रेस्ट न्यू लाईफ स्कूलमध्ये इयत्ता 3 ची विद्यार्थिनी होती. तिची आई सौम्या तिरुविलवामाला सर्व्हिस कोऑपरेटिव्ह बँकेत डायरेक्टर आहे. पाळायन्नूर पोलिसांनी माहिती घेत आवश्यक कारवाई केली आहे. दरम्यान, सविस्तर फॉरेन्सिक तपासणीनंतर या घटनेबद्दल अधिक माहिती समोर येईल असे सांगण्यात आले आहे.

अनेक अशा घटना घडल्या आहेत : फोन ब्लास्ट होण्याची ही पहिलीच घटना नाही. या पूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशमध्येही अशीच घटना घडली होती. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील कैलासनगर इथं राहणाऱ्या अर्जुन पवार या तरुणाच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला होता, त्यामुळे तो तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला आणि दोन्ही पायांना जखमा झाल्या होत्या. मित्राशी गप्पा मारत असताना या तरुणाच्या पँटच्या खिशातून धूर निघू लागला. त्याला काही समजण्यापूर्वीच खिशात मोबाईलचा स्फोट होऊन मोबाईल खाली पडला होता. या पूर्वी 12 वर्षांचा एक मुलगा मोबाईलचा स्फोट झाल्याने जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं.

लेदर बॅग्ज वापरणंही चांगलं नाही : बऱ्याचदा फोन ओव्हरहिट झाल्याने ब्लास्ट होण्याची शक्यता बळावते. फोन सारखा गरम होत असेल किंवा तो चार्जिंगला लावला असेल व त्याचा वापर केला जात असेल तरीही फोनमध्ये ब्लास्ट होऊ शकतो. या पूर्वी अशा घटना घडल्या आहेत. बरेच जण मोबाईलमध्ये हेव्ही गेम्स खेळतात, त्यामुळेही फोनचा स्फोट होऊ शकतो. तसेच लेदर बॅग्ज वापरणंही चांगलं नाही. कारण त्या बॅग्ज लवकर गरम होतात, त्यात फोन ठेवलेला असेल तर तो उन्हाळ्यात स्फोट होऊ शकतो.

हेही वाचा :कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण सिंह वाद विकोपाला; बबिता फोगटच्या नव्या आरोपाने खळबळ

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details