चंदीगड :'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग 18 मार्चपासून फरार आहे. पंजाब पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत. आता अमृतपाल सिंगची एनआरआय पत्नी किरणदीप कौर उघडपणे मीडिया समोर आली आहे. किरणदीप कौरने एका खासगी मासिकाशी संवाद साधताना सांगितले की, मी अमृतपाल सिंग याच्यासोबत वारिस पंजाब दे संघटनेबद्दल फारसे बोलले नाही. तो नेहमी त्याच्या धार्मिक उपदेशात व्यस्त असायचा. किरणदीप कौर म्हणाल्या की, अमृतपालने कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्याची पहिली प्राथमिकता शीख धर्म आणि दुसरी प्राथमिकता मी असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृतपालशी ओळख कशी झाली? : अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौर पुढे बोलताना म्हणाली की, धर्माचा प्रचार करणे चुकीचे नाही. मात्र त्यासाठी अमृतपालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय किरणदीप कौर अमृतपाल सिंगसोबतची मैत्री आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलली. ती म्हणाली की, आमची मैत्री इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली. अमृतपाल याच्या विचारांनी मी प्रभावित झाले. मला समजले की ती व्यक्ती मानवतेसाठी आणि धर्मासाठी काम करते आहे. त्यानंतर हे नाते मैत्रीतून लग्नात बदलले, असे ती म्हणाली.
अमृतपाल सिंग कुठे आहे? : या प्रश्नावर बोलताना किरणदीप कौर म्हणाली की, 18 मार्चनंतर त्याच्याशी कधीच संभाषण झाले नाही. मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवरून अमृतपाल सिंग कुठे आणि कसा हे सांगितले जात आहे. ती म्हणाली की, 18 मार्चपासून अमृतपाल सिंग याचे कुटुंबीय चिंतेत आहेत की त्यांचा मुलगा कुठे गेला आहे. ती म्हणाली की, अमृतपाल सिंग याने नेहमीच शीख धर्म आणि अधिकारांचाच प्रचार केला आहे.