महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amritpal Singh Arrest : अमृतपाल सिंगच्या 10 समर्थकांना अटक; अनेक हत्यारे, वाहने जप्त - पंजाबमध्ये इंटरनेट बंद

पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी याला अटक केली आहे. तसेच राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा 20 मार्चला 12 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे. आज सिंगच्या 10 समर्थकांना अटक केली असून, त्यांच्याकडून हत्यारे, वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Amritpal Singh Arrest
अमृतपाल सिंह

By

Published : Mar 19, 2023, 12:40 PM IST

Updated : Mar 19, 2023, 4:51 PM IST

नवी दिल्ली :पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' चा प्रमुख अमृतपाल सिंह याला पकडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी अमृतपाल सिंहच्या कथित सल्लागार आणि फायनान्सरला अटक केली आहे. केंद्रीय एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंहचा सल्लागार आणि फायनान्सर दलजीत सिंग कलसी उर्फ ​​सरबजीत सिंग कलसी याला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया -अमृतपाल सिंगला पकडण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचा पाठलाग करत असताना तो आमच्या पुढे एका लेन लिंक रोडवर आला. त्यावेळी आम्हाला मागे सोडत 5 ते 6 मोटारसायकल स्वारांना त्याने धडक दिली, यातील काही नागरिक हे आम्हाला सिंगचा पाठलाग न करण्याच्या उद्देशाने रस्त्यात उभे असल्याची माहिती पंजाबचे डीआयजी स्वपन शर्मा यांनी दिली.

आतापर्यंत दहा जणांना अटक-आम्ही अमृतसर ग्रामीण भागात एफआयआर नोंदवत आहोत, आम्ही आतापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. या वाहनांना वित्तपुरवठा कसा करण्यात आला याचा आम्ही तपास करत आहोत. काही फोन जप्त करण्यात आले आहेत, त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे, अशी माहितीही डीआयजी स्वपन शर्मा यांनी दिली.

राज्यात इंटरनेट सेवा बंद : अमृतसरच्या जल्लूपूर खेडा गावात अमृतपाल सिंह याच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाब पोलिस आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सने जालंधरमध्ये फ्लॅग मार्च काढला आहे. शनिवारी रात्री उशिरा जालंधरचे आयुक्त कुलदीप सिंग चहल यांनी अमृतपाल सिंहला फरारी घोषित केले होते. जालंधरच्या आयुक्तांनी सांगितले की, अमृतपाल सिंहला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याचे काही बंदूकधारी साथीदारही पकडले गेले आहेत. त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपालच्या निवासस्थानाची झडती :आयुक्तांनी पुढे सांगितले की, पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंहचा शोध सुरू केला आहे. आम्ही त्याला लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ७८ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांची पथके सातत्याने छापे टाकत आहेत. दुसरीकडे, अमृतपाल सिंहच्या वडिलांनी दावा केला आहे की, पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली मात्र पोलिसांना तेथे काहीही बेकायदेशीर आढळले नाही. अमृतपालचे वडील तरसेम सिंह यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले की, पोलिसांनी अमृतपाल सिंह घराबाहेर पडण्यापूर्वीच त्याला अटक करायला हवी होती.

हे ही वाचा :Rahul Gandhi News : कोणत्या महिलांवर अन्याय झाला? माहिती घेण्याकरिता दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या घरी

Last Updated : Mar 19, 2023, 4:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details