चेन्नई:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मोदी सरकारच्या ९ वर्षे पूर्तीनिमित्त गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी रात्री चेन्नईला पोहोचल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाली आहे. त्यामुळे भाजप आणि तामिळनाडून सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
केंद्रीय गृहमंत्री नांदेडहून रात्री ९.२० वाजता निघाले. ते चेन्नई विमानतळावर उशिरा रात्री पोहोचले. शाह हे विमानतळावरून त्यांच्या गिंडी येथील हॉटेलसाठी निघाले असताना विमानतळाजवळील रस्त्यावरील पथदिवे बंद झाले. हे दिवे जाणूनबुजून केल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सरकारवर केला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, अशी भीतीदेखील भाजपने व्यक्त केली आहे.
अचानक वीज पुरवठा कसा खंडित झाला?रस्त्यावरील दिवे बंद करणे ही सुरक्षेतील त्रुटी समजावी, असे असे तामिळनाडू भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष करू नागराजन यांनी म्हटले आहे. पुढे, ते म्हणाले, की गृहमंत्र्यांचा आधीच निश्चित करण्यात आला होती. तरीही त्या मार्गावरील पथदिवे बंद करणे ही गंभीर बाब आहे. या प्रकाराची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. अचानक वीज पुरवठा कसा खंडित झाला? संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तामिळनाडू सरकारकडून जाणीवपूर्वक दिवे बंद केल्याचा आरोप करत आंदोलन केले आहे.